ABP Majha Headlines : 8 PM: 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 PM: 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
नागपूर हिट अँड रन प्रकरणात बावनकुळेंचा मुलगा संकेत चौकशीच्या फेऱ्यात, अपघातावेळी कारमध्येच असल्याचं समोर, टायरची स्थिती पाहता घटनास्थळावरून पळ काढल्याचा संशय
हिट अँड रनवरून विरोधकांचा हल्लाबोल...संकेत दारू प्यायला नव्हता तर गाडीची नंबरप्लेट का काढली, वडेट्टीवारांचा सवाल...तर बावनकुळेंना अडकवलं जातंय, फडणवीसांचा पलटवार
महायुतीत २५ जागांवर मैत्रिपूर्ण लढतीबाबत भाजपकडून चाचपणी, अमित शाहांच्या दौऱ्यात चर्चा झाल्याची माहिती...भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चर्चेचं खंडन...
बारामतीत गणेश फेस्टिव्हलला न आल्यानं अजित पवारांच्या फोटोवर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलं काळं कापड...सेनेच्या पदाधिकाऱ्याचा बॅनर फाडत राष्ट्रवादीचंही उत्तर...
पुण्यातल्या कसबा गणपतीच्या दर्शनावेळी अजित पवारांच्या समोरच तुतारीचं वादन...थांबवायचा प्रयत्न करतोय, पण हे वाजवतायत, अजितदादांची मिश्किल प्रतिक्रिया...
मला न विचारता निवडणूक आयोग संपर्क प्रमुख केलं हे मला मान्य नाही, समितीत काम करण्यास मी असमर्थ, किरीट सोमय्यांचं रावसाहेब दानवेंना पत्र