ABP Majha Headlines : 8 AM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 AM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीतला जागावाटपाचा तिढा कायम, काल रात्री उशिरापर्यंत वर्षावर बैठक, उद्या अमित शाहांना भेटून उमेदवार फायनल होण्याची शक्यता
विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज, शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता
काँग्रेसची राज्यातल्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर... सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुणयातून धंगेकर, कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी
सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील लोकसभा लढवणार, मिरजेतील सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा
रोहित पवार आणि युंगेंद्र पवारांना सुरक्षा पुरवा, सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस अधीक्षकांकडे मागणी
कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक, आज सकाळी PMLA कोर्टात हजर करणार, सुप्रीम कोर्टातही सुनावणी होण्याची शक्यता
मुख्यमंत्रिपदी केजरीवालच राहणार, दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांचं वक्तव्य, मात्र तसं झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, कायदेतज्ज्ञांचं मत
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडयाचं आरक्षण फूल, प्रवाशांचा ओढा बसेसकडे, आतापर्यंत १७३ बस आरक्षित.