ABP Majha Headlines : 8 AM : 15 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून प्रस्ताव आल्याचा दावा
धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये सहा दिवसांपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री शिंदेंची आज आंदोलकांसोबत सह्याद्रीवर बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष
उद्धव ठाकरे आज शिर्डी, संभाजीनगर दौऱ्यावर, शिर्डीनंतर पैठणमध्ये शिवसंवाद मेळावा, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
मंत्री तानाजी सावंत परांडा येथील शिवसैनिकांच्या मेळाव्याला हजर, धाराशिवमध्ये मात्र दांडी, शिंदे शिवसेनेच्या धाराशिवमध्ये दोन गट पडल्याची चर्चा
मी काँग्रेसमध्येच राहणार, कामासाठी गडकरींना भेटलो, आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण...
ठाण्यातील आनंदाश्रम येथे पैसे उधळल्याप्रकरणी दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. ही घटना ठाण्य़ाला काळीमा फासणारी. राजन विचारेंची टीका.
सणासुदीच्या काळात खाद्य तेलांच्या किंमती भडकल्या, २० ते २५ रुपयांनी वाढ...कच्च्या तेलावरचं आयातशुल्क वाढवल्यानं दरवाढ...
दोन दिवसांत चांदीच्या किमतीत ७ हजार रुपयांनी वाढ, किलोचा दर ९१ हजार रुपयांवर.. सोनंही दोन हजार रुपयांनी महागलं..