ABP Majha Headlines : 8 AM : 11 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 AM : 11 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक.. राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित राहणार..
निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचं गूढ काय?, सामनाच्या आग्रलेखातून मोदी सरकारला सवाल.. तर मोदी राजवटीतील उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी.. सामनातून टीका
नवी दिल्लीत आज महाराष्ट्राचं जागावाटप ठरणार, भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीत जाणार
आचारसंहिता लागण्याआधी राज्य मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक, महालक्ष्मी रेसकोर्समधील थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता
प. बंगालमधील ४२ लोकसभा जागांसाठी तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर, नुसरत जहां यांचं तिकीट कापलं, तर संसदेतून निष्काषित केलेल्या महुआ मोईत्रांना पुन्हा कृष्णानगरमधून उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणी चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधत शरद पवार गटाची याचिका