ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 1 Sep 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 1 Sep 2024 : Maharashtra News
पोलिसांची परवानगी नसतानाही मविआ जोडे मारो आंदोलनावर ठाम..हुतात्मा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तर गेटवे ऑफ इंडिया सकाळी दहा वाजल्यापासून पर्यटकांसाठी बंद राहणार
मनोज जरांगे सिंधुदुर्गातील मालवणमध्ये दाखल, मालवण रॉक गार्डन ते राजकोट किल्ल्यापर्यंत रॅली, किल्ल्याची करणार पाहणी
रामगिरीवर शिंदे, फडणवीस अजित पवारांची साडे चार तास बैठक, महायुतीच्या जागावाटपासंदर्भात तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती
तानाजी सावंतांनंतर भाजपच्या नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्ला, असंगाशी संग झाला, गणेश हाकेंचं वक्तव्य...तर आपले कार्यकर्तेही बोलू शकतात, अजितदादांचा इशारा...
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं समन्स, राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत बोलावल्याची माहिती...राष्ट्रवादीच्या नेत्यांची सावंतांवर आगपाखड...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात निलंगा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट...१६ वर्षांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसची तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी गुन्हा होता दाखल...
पुण्यात कॅन्सर हॉस्पिटलसाठी प्रस्तावित असलेली पाचशे कोटींची जागा खासगी बिल्डरला अवघ्या साठ कोटीत देण्याचा डाव...रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाला सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध...
गणेशोत्सवकाळात १७ सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी.. चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाचा निर्णय