ABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

बीडमध्ये १ हजार २२२ शस्त्र परवाने कसे वाटले, गोळीबाराचा व्हिडिओ पोस्ट करत अंजली दमानियांचा सवाल..माझाच्या बातमीनंतर गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर, आधीच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपद भाड्यानं दिलं होतं, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल...तर, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोन कंपन्यांमध्ये भागीदार, अंजली दमानियांचा दावा...

महाराष्ट्रातल्या महिला म्हणतात आपल्याला भीती वाटतेय, बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य...महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित, फडणवीसांचं उत्तर...

पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती...गैरप्रकार खपवून घेणार नाही, बावनुकळे, संजय शिरसाट आणि योगेश कदमांकडून अधिकाऱ्यांना तंबी...

नवीन दालन मिळताच मंत्री अॅक्शन मोडवर...अजित पवार, दादा भुसे, प्रताप सरनाईक कामाला...एकनाथ शिंदे मात्र रमले दरे गावातल्या शेतावर...

महसूलमत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्याची अदलाबदल होण्याची शक्यता...गोपीनाथ मुंडेंच्या वास्तव्यामुळे पंकजांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा...

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात...पण नवीन नोंदणीचा अजून निर्णय नाही, आदिती तटकरेंची एबीपी माझाला माहिती...२१०० रुपये हप्ता करण्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram