ABP Majha Headlines : 1PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी गॅरेंटी, शरद पवारांची मोदी सरकारवर कडाडून टीका, बळीराजावर हे दिवस आणणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, पवारांची टीका
मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा
मुंबई महापालिकेला सुप्रीम कोर्टाने फटकारलं, मलवाहिन्यांची सफाई करणाऱ्य़ा कामगारांना अजून थकीत वेतन का नाही, सुप्रीम कोर्टाचा सवाल, १९ मार्चचा सुनावणीला हजर राहण्याचे आयुक्तांना आदेश
नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक, फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शाह, जेपी नड्डा, बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा
उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक, १०० लोकसभा मतदारसंघांवर चर्चा, विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
राहुल गांधींनी विचार करुन वक्तव्यं करावीत, पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
वेळ पण तीच, मालक पण तोच, लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या फ्लेक्सवर नवी टॅगलाईन