ABP Majha Headlines : 7 AM : 7 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM : 7 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी, मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर.... मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीसही आज दिल्लीत असणार
जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या  आजपासून मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन जागावाटप अंतिम करणार
हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, हाती तुतारी घेणार... इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारात आज कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश 
अब्दुल सत्तारांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी न ऐकल्याच्या निषेधार्थ राज्यातील बाजार समित्यांचा बंद, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम 
नाशिक शहरातील चारही मतदारसंघात राज ठाकरे उमेदवार देणार, जिल्ह्यातील डझनभर जागेवर चेहरा मिळाल्याचा मनसेचा दावा
राज्यपालनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, महायुती सरकारने मविआची यादी मागे घेणं, बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं आज अनावरण, पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मसापमध्ये पार पडणार कार्यक्रम
मेट्रो अॅक्वा लाइन ३ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत... आरे जेव्हीएलआर स्टेशन आणि बीकेसी  स्थानकांवरुन सकाळी ११ वाजता सेवेला सुरुवात तर उद्यापासून नियमित सेवा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram