ABP Majha Headlines : 7 AM : 27 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM : 27 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
नितीन गडकरी आणि राजू पारवे आज उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित, पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस 
अमरावतीतून नवनीत राणांनाच उमेदवारी दिली तर बंड करावं लागेल, बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा, उमेदवार उभा करण्याचे दिले संकेत
वंचित बहुजन आघाडीला  महाविकास आघाडीकडून आता ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव... प्रकाश आंबेडकर आज सकाळी ११ वाजता जाहीर करणार अंतिम निर्णय 
प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोेज जरांगेंची भेट, माझं राजकारणाशी काहीही देणंघेणं नाही, मनोज जरांगेंकडून पुनरुच्चार
शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम, इच्छुक उमेदवारांची नावं शिवसेनेकडून भाजपला सादर, जागा जिंकण्यासाठी योग्य उमेदवार सेनेकडे असल्याचा दावा
विजय शिवतारेंना शिवसेना पक्षशिस्तभंगाची नोटीस पाठवणार, पक्षादेश मानला नाही तर हकालपट्टीची शक्यता, शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम
साताऱ्यात आज उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा, साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटानं सोडल्याची चर्चा, बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram