ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 7AM 26 July 2024 Marathi News
काल झालेल्या मुसळधार पावसानंतर पुण्यात आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात
मुंबईत पहाटेपासून पावसाची विश्रांती, आज मुंबईतल्या शाळांना सुट्टी नाही, रेल्वे रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा, कॉलेजला आज सुट्टी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती, कर्नाळ रस्ता पाण्याखाली, पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला, कोयना धरणातून २० हजार क्युसेकने विसर्ग सुरूच
मुसळधार पावसामुळे झालेलं नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आज दुपारी मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार
मानहानी प्रकरणात आज राहुल गांधी सुलतानपूरच्या एमपी-एमएलए कोर्टात हजर होणार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अमित शाहांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या खटल्याची सुनावणी
नाशिक, संभाजीनगर, सोलापुरात तातडीने कांद्याची महाबँक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, अणुउर्जेच्या मध्यमातून प्रक्रिया करत साठवणुकीची सोय
सलमान खानच्या घरावर फायरिंग करण्याआधी गुंड अनमोल बिश्नोईचं आरोपींसमोर इन्स्पिरेशनल स्पीच, चार्जशीटमध्ये नोंद, भाषण देऊन गोळीबारासाठी दिलं प्रोत्साहन
करगिल विजय दिवसाचा आज २५ वा वर्धापन दिन, कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदी वाहणार शहीदांना आदरांजली
जागतिक क्रीडा महाकुंभाची नांदी, पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात, नीरज चोप्रा, पी.व्ही.सिंधू, अविनाश साबळेसह भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा दिलासा, कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या, रविवारपासून आरक्षण