ABP Majha Headlines : 7 AM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक, आज सकाळी PMLA कोर्टात हजर करणार, सुप्रीम कोर्टातही सुनावणी होण्याची शक्यता
मुख्यमंत्रिपदी केजरीवालच राहणार, दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांचं वक्तव्य, मात्र तसं झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, कायदेतज्ज्ञांचं मत
काँग्रेसची राज्यातल्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर... सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुणयातून धंगेकर, कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी
सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील लोकसभा लढवणार, मिरजेतील सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा
पंतप्रधान मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर... सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातली ते राज्यानं पाहिलंय... उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा टोला
लोकसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात किती लीड देता तेच तुमचं प्रगती पुस्तक, पुढचं तिकीट त्यावर ठरेल, शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांची तंबी
महाविकास आघाडीने तीन जागांचा दिलेला प्रस्ताव फेटाळला, वंचितकडून प्रथमच जाहीर, प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट, ६ जागांचा प्रस्ताव दिल्याची बातमी खोटी असल्याचं केलं स्पष्ट
अजूनही वेळ आहे, उमेदवार बदला, रामराजे निंबाळकरांचं महायुतीला मेळाव्यातून आवाहन, मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार नाही, रामराजेंची गर्जना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram