ABP Majha Headlines : 7 AM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अमित शाहांसोबतच्या भेटीत राज ठाकरेंकडून मुंबईतल्या दोन जागांची मागणी, शाहांकडून मात्र एकाच जागेची ऑफर
विधानसभेची चर्चा तेव्हाच करू, उद्धव ठाकरेसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको, राज ठाकरेंसमोर अमित शाहांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, राज ठाकरे आणि शाहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका
महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी २१ मार्चला जाहीर होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, सांगली, भिवंडी काँग्रेसचं लढणार, पटोलेंचा निर्धार.
सांगलीची जागा १०० टक्के ठाकरे गटाचीच, संजय राऊतांचा दावा, ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेते आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती, तर अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक
लोकसभा निवडणुकांमुळे UPSCची प्रीलिम्स परीक्षा पुढे ढकलली, २६ मे ऐवजी १६ जूनला परीक्षा घेणार
भिवंडीच्या वलपाडा परिसरात भीषण आग, एकूण आठ गोदामं आणि दुकानं जळून खाक, चार तासांनी आग नियंत्रणात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram