ABP Majha Headlines : 7 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय
भाजपची दुसरी यादी जाहीर, राज्यातल्या २० उमेदवारांची घोषणा, महायुतीचं जागावाटप होण्याआधीच भाजपची नावांची घोषणा
राज्यातल्या पहिल्या यादीत नितीन गडकरींच्या नावाची घोषणा, पंकजा मुंडेंची प्रतीक्षा संपली, बीडमधून लोकसभेच्या रिंगणात, सुधीर मुनगंटीवारांनाही लोकसभा उमेदवारी, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट
मुंबईतून विद्यमान दोन खासदारांची तिकीटं कापली, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा रिंगणात, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचं तिकीट कापलं
दादर नगर हवेलीतून भाजपची कलाबेन डेलकरांना उमेदवारी, उद्धव ठाकरेंना धक्का, तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना तिकीट
बारामतीतून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम, मुख्यमंत्र्यांशी आज दुपारी चर्चा करणार
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार, सुजय विखेंविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये राहुल गांधी सभा घेणार, शरद पवार आणि संजय राऊत देखील उपस्थित राहणार
उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर, श्रुंंगारतळी आणि दापोलीत सभा घेणार