ABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

उद्या नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार... मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री
देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि तटकरेंमध्ये 'सागर'वर पाऊण तास बैठक,राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठीची १ राज्यमंत्री, ९ कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात,सुत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा, उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरुन दोन मतप्रवाह...
लोकसभेत संविधानावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आज संविधानावर बोलणार
एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा जाहीर, विधेयक लोकसभेत सादर केलं जाणार,एक देश एक निवडणुक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram