ABP Majha Headlines : सकाळी 7 AM वाजताच्या हेडलाईन्स : 7 AM 03 Nov 2024 : एबीपी माझा लाईव्ह

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ, आज कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्वेला शिवसेनेची पहिली जाहीर प्रचार सभा.
मनोज जरांगे मराठा- मुस्लिम- दलित असे समीकरण जुळवत आज उमेदवार देणार, अनेक मतदारसंघात इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांची आज बैठक
माहीममधून सरवणकरांची उमेदवारी मागे न घेण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत, राज ठाकरेंना युतीविषयी विचारुनही, चर्चा न करताच थेट मनसेचे उमेदवार दिल्याचा आरोप... 
पोलिसांच्या गाडीतूनच महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जाते, शरद पवारांचा गंभीर आरोप...पवारांच्या काळातच अशी रसद पुरवली जायची, फडणवीसांचा हल्लाबोल...
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ.. 'फोर्स वन'चे १२ जवान सुरक्षेत तैनात.. फडणवीसांबाबत दोन अलर्ट आल्याची सूत्रांची माहिती..
भिवंडी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या रुपेश म्हात्रेंची बंडखोरी, मुलाला जिंकवण्यासाठी उद्धव ठाकरे आमचा बळी देत आहेत, सपाच्या रईस शेख यांना उमेदवारी दिल्याने रुपेश म्हात्रेंचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram