ABP Majha Headlines : 7 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  7 PM : 6 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भरदिवसा, भर रस्त्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंबंधी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणानंतर मध्य प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. 

मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील कोयला फाटक या भागातील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. बलात्काराची ही घटना घडत असताना आजूबाजूचे कोणीही त्या महिलेच्या मदतीसाठी गेले नाहीत. त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. उज्जैनमध्ये ही घटना घडत असताना लोक फक्त व्हिडीओ काढत होती. त्या महिलेच्या मदतीला कोणीही गेले नसल्याने लोकांमधील संवेदनांना काय झालंय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  

उज्जैनच्या कोयला फाटक भागात एका महिलेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ हा व्हिडिओ दुपारचा आहे. भर रस्त्यावर मोकळ्या ठिकाणी एका तरुणाकडून या महिलेवर बलात्कार होत आहे. महिलेला मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram