ABP Majha Headlines : 06 PM : 31 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मराठ्यांना ओबीसी कोट्याटून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा...
((...तर सर्व २८८ जागा लढणार-जरांगे))

शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा, एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी 
((शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट नाराज?))

४ जूननंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, काही मंत्रांची खाती बदलणार... तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती... 
((४ जूननंतर मंत्रिमंडळात मोठे बदल?))

भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवार गटात जुंपली...भुजबळांनी आव्हाडांना पाठिंबा देणं दुर्दैवी, हसन मुश्रीफांची नाराजी...तर मुश्रीफ सीनिअर आहेत, भुजबळांचा टोला...

मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोेरनारेंनी घेतले दोन उमेदवारी अर्ज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर...
((शिक्षक निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरी?))

मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे उद्या अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष...

परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्षं महाराष्ट्र अव्वल, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात सव्वा लाख कोटींचा एफडीआय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
((परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल!))

पुण्यातील ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी दोन्ही डॉक्टर आणि शिपायावर बडतर्फीची टांगती तलवार, वैद्यकीय शिक्षण खात्याकडून विभागीय चौकशी होणार 
((तावरे, हळणोरवर बडतर्फीची तलवार))

बीडच्या माजलगामधील पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकरमध्ये आढळला १ कोटी ६१ लाखांचा मुद्देमाल, कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर सध्या जामिनावर.

विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी कोठडी, तर ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अगरवालचा ताबा पुणे पोलीस घेऊ शकतात. 

 

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू, माध्यमांनी जनजागृती केल्यामुळे परिस्थिती जवळपास सामान्यच
((ठाणे स्थानकात युद्धपातळीवर काम सुरू))

बार आणि पब्जसाठी सरकारची नियमावली जाहीर...बारमधल्या सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट पोलीस स़्टेशनमध्ये...वेळमर्यादा न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार...

पंढरपुरातील आढळलेल्या गुप्त खोलीत विविध प्रकारच्या मूर्ती सापडल्या, मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram