ABP Majha Headlines : 6 PM : 20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 6 PM  : 20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलं होेतं, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा 
उद्धव ठाकरेंना वेड लागलंय, मला नाही, आदित्य ठाकरेंना सीएम करण्याच्या दाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं, फडणवीसांचा टोला 
छ.संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी, महायुतीकडून संदीपान भुमरे वि. मविआचे चंद्रकांत खैरेंमध्ये लढत 
बारामतीत सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग मी इतक्या वर्षात काहीच केलं नाही का?, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
पहाटेच्या शपथविधीचा अजित पवारांचा दावा शरद पवारांनी फेटाळला, भाजपसोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल, पवारांचं प्रत्युत्तर 
अमेठीनंतर वायनाडमधूनही बाहेर पडणार राहुल गांधी, नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
राज्यात पुन्हा पावसाच्या सरी, सोलापूर, धाराशिव, सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, फळबागांना मोठा फटका.
महाराष्ट्रातील सरासरी पाणीसाठा ३२ टक्क्यांवर, मराठवाड्यातील जायकवाडी धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram