ABP Majha Headlines : 6 PM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मी पळणारा नाही, लढणारा माणूस, अमित शाहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं विधान,
सध्या काम सुरु ठेवण्याचा शाहांचा सल्ला, तर पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, मित्रपक्षांना आवाहन
मुंबईत मराठी माणसाची मतं ठाकरेंना मिळाली नाहीत, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचा हल्लाबोल, ठाणे-कोकणात ठाकरे अपयशी ठरल्याची टीका
((मराठी मतं मिळवण्यात ठाकरे अपयशी-फडणवीस))
नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार, देश-परदेशातील आठ हजार मान्यवरांना निमंत्रण
प्रफुल पटेल उद्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार, नवी दिल्लीत फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब
((प्रफुल पटेल पुन्हा केंद्रीय मंत्री होणार))
खासदार श्रीकांत शिंदे मंत्रिपद घेणार नाहीत, पक्षबांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार, डॉ. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
रामदास आठवलेंना यंदाही राज्यमंत्रिपदच मिळणार, कॅबिवेटचं आश्वासन मिळूनही सध्या राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावं लागणार
((आठवलेंना यंदाही राज्यमंत्रिपदच))
ठाकरे गटाचे दोन नवे खासदार संपर्कात, हे दोन खासदार आणखी चार खासदारांना घेऊन येणार,खासदार नरेश म्हस्के यांचा दावा, म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांमधील वाद वाढला, दानवेंकडून सत्तारांना अफझलखानाची उपमा, शिवरायांनी अफझलखानाचं काय केलं होतं हे सर्वांना ठाऊक, दानवेंचं वक्तव्य
((अब्दुल सत्तारांना अफझलखानाची उपमा!))
सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि केसेस मागे घ्या, नाहीतर महायुतीचे आमदार पाडणार, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा
(('केसेस मागे घ्या नाहीतर...'))
राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनवा, दिल्लीतील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखी मागणी, पुढील रणनीतीवरही चर्चा
पुणे अपघातातील पोर्श कारचं क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करणार, लष्करी अधिकाऱ्यांची मदत घेणार पुणे पोलीस
(('त्या' कारचं इम्पॅक्ट अॅनालिसिस करणार))
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी जान्हवी मराठेला गोव्यातून अटक, तर होर्डिंग बनवणाऱ्या सागर कुंभारला देखील बेड्या
(())
नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही, २३ लाखांपैकी केवळ १६०० जणांचा प्रश्न...केंद्रीय उच्चशिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण...
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात, रत्नागिरीतही मुसळधार पाऊस
((पुणे, रत्नागिरीत धो-धो))