ABP Majha Headlines : 06 PM: 01 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी बाजी मारणार, लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सर्वात मोठा एक्झिट पोल, फक्त एबीपी माझावर
महाराष्ट्रात जनतेचा कौल महायुतीला की, मविआला, सहानभुतीची लाट चालणार का, सर्वात मोठा एक्झिट पोल एबीपी माझावर
इंडिया आघाडी देशात २९५हून अधिक जागा जिंकेल, इंडियाच्या बैठकीनंतर खरगेंनी व्यक्त केला विश्वास, तर एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसही सहभागी होणार
लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान, नेते, अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.६८ टक्के मतदान
पुणे अपघातप्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आईने स्वतःचं रक्त दिल्याची कबुली, शिवानी आणि विशाल अगरवालने कट रचला, मुलगाच गाडी चालवत असल्याची कबुली
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेला विशाल अगरवाल आता गुन्हे शाखेच्या ताब्यात,
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पुन्हा अटक
अपघात झाल्यावर स्थानिक आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक, सुनील टिंगरेंवरील आरोपांबाबत अजित पवारांचं वक्तव्य
((अजितदादांकडून टिंगरेंची पाठराखण))
सिद्धू मूसेवालाची हत्या केलेल्या पिस्तुलानेच सलमानच्या हत्येचा रचला होता कट.. चौकशीतून धक्कादयक माहिती समोर.. तर या शस्त्रांचं पाकिस्तान कनेक्शनही उघड..
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस, लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानकांपर्यंतच सुरू
धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या,
तेरणा धरणात अवघा अर्धा टक्के पाणीसाठा, शहरात नऊ दिवसाला पाणीपुरवठा
छत्रपती संभाजीनगरमध्ये भुकेनं व्याकुळ झालेल्या जनावरांची व्यथा 'माझा' नं मांडल्यानंतर महाराष्ट्र भरातून मदतीचा हात. एबीपी माझाचा इम्पॅक्ट.