ABP Majha Headlines : 1 PM : 6 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  1 PM : 6 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली तीन आठवड्यांची वेळ, अजित पवारांची विनंती मान्य
देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेले रमेश केरे पाटील ताब्यात, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्हला अडवलं
मराठवाड्यातील आमदारांच्या बैठकीनंतर आज मुंबई महानगरातील आमदारांची फडणवीसांसोबत बैठक...विधानसभेच्या अनुषंगानं चर्चा होण्याची शक्यता. 
उद्धव ठाकरे आजपासून ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटी, सोनिया गांधी, खरगेंना ठाकरे भेटणार
कालच्या पडझडीनंतर सेन्सेक्स आज ९०० 
अंकांनी वर, निफ्टीमध्येही पावणे तीनशे अंकांची
उसळी, जपानच्या शेअर बाजारातील उसळीचे भारतातही परिणाम
पुण्यात झिकाचा धोका वाढला, शहरात २६ गर्भवतींसह ६६ रुग्ण, झिकाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची होणार तपासणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, आज एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा, संप रोखण्यासाठी सरकारच्या हालचाली
मराठवाड्यातील इनाम जमिनीची वर्गवारी
बदलण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध, मंदिरं
आणि मठ परावलंबी होण्याची शक्यता असल्याचं विहिंपचं मत
 बांगलादेशातल्या स्थितीबाबत सरकारची सर्वपक्षीय बैठकीत माहिती, विरोधी पक्षाची सरकारला सहकार्याची भूमिका, ८००० विद्यार्थी माघारी परतल्याचं सरकारने केलं स्पष्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram