ABP Majha Headlines 6.30 AM Top Headlines 14 May 2025 एबीपी माझा सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स


ABP Majha Headlines 6.30 AM Top Headlines 14 May 2025  एबीपी माझा सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स

पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसला मोदींची भेट, जवानांशी साधला संवाद...एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानची केली पोलखोल... 

काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवणार, भारतानं पाकिस्तानसह अमेरिकेला ठणकावलं... पीओकेचा ताबा पाकनं सोडवा, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून निर्वाणीचा इशारा... 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता, बैठकीत कोणती चर्चा होणार याकडे लक्ष... 

काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बोलावली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राज्य कार्यकारणीची बैठक... जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष 
 
ऑपरेशन सिंदूरच्या यश साजरं करण्यासाठी, मुंबई ठाण्यात भाजपकडून आज तिरंगा रॅली, मुंबईत मुख्यमंत्र्यासह भाजप नेते तर ठाण्यात एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार... 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार, पारंपारिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन.  

मान्सून महाराष्ट्रात सहा जून रोजी दाखल होण्याची शक्यता... आज आणि उद्या विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola