ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP Majha  

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंंद लिफाफ्यात होणार सादर... 
सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज.. जामीन अर्जावर आज सुनावणी.. खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या दोन टीम रवाना... 
प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीच. आज कोर्टात कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी. सुनावणीसाठी कोरटकरांनी उपस्थित रहावं की नाही यासंदर्भात होणार निर्णय. 
अर्थसंकल्पावर आज चर्चा होणार. विरोधकांनी केलेल्या आरोपांना अर्थमंत्री उत्तर देणार... दरम्यान योजनांची स्थिती काय? याची  वस्तुस्थिती देखिल अजित पवार मांडणार. 
कराडनं 'आवादा'कडे सहा वेळा मागितली खंडणी.. चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेच्या जबाबाचा उल्लेख.. सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा... 
परळीतील जगमित्र कार्यालयातून वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप, आवादा अधिकाऱ्याच्या जबाबातून स्पष्ट उल्लेख, धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola