ABP Majha Headlines : 6.30: 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

नागपूर वेधशाळेचा पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, नवताप सुरू झाल्याने ३ जूनपर्यंत काहिली... यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता, देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज
((यंदा धो-धो बरसणार!))

लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती, लोकसभेच्या स्ट्राईकरेटनुसार ठरणार विधानसभेचं जागावाटप

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडून जप्त...घटकांबळेकडून ५० हजार, तर डॉ. हळनोरकडून अडीच लाख रुपये हस्तगत...

ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनमधील दोन्ही डॉक्टरांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी, स्विफ्टमधून तीन लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील अटक... 

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?, अंजली दमानियांचा सवाल...मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन केला नाही, अजित पवारांंचं उत्तर...

विधानपरिषदेत स्वतंत्र लढण्याची मनसेची भूमिका.. लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा, विधानपरिषदेत मोदी नाही, मनसे नेते अभिजीत पानसेंचं वक्तव्य

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणात रेल्वे पोलिस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याला SIT चौकशीसाठी समन्स...भूखंड आपला असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा कशाच्या आधारावर केला, तपास सुरू...

समृद्धी महामार्गाचा अखेरचा ७६ किलोमीटरचा टप्पा याचवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार, एमएसआरडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती

पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडवरच्या बोगद्यामध्ये अनेक ठिकाणी पाणीगळती, तर कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, वाहतुकीवर परिणाम नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत कामोठे, खारघर भागात आज पाणी नाही, मोरबे धरण आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात मान्सूनपूर्व दुरूस्तीच्या कामांमुळे पाणीकपात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram