ABP Majha Headlines : 5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा.. तर माळशिरसमधून उsत्तम जानकरांच्या नावाची घोषणा. 
मविआतून परांड्यासाठी ठाकरे पक्षाचे रणजीत पाटील आणि पवार पक्षाचे राहुल मोटे रिंगणात.. ठाकरेंशी चर्चा करून परांड्यावर योग्य निर्णय घेऊ, जयंत पाटलांची माहिती..
मविआत मुंबईतल्या जागेचा तिढा अद्यापही कायम.. ठाकरे आणि काँग्रेस दोन्ही पक्ष वर्सोवाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती, मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली
माहीमपाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता... बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं...
मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम, काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता...आज अंतिम निर्णय होणार का याकडे लक्ष
सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधानंतरही, अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा उद्या भाजप प्रवेश.. चंद्रपूरमधून  उमेदवारी निश्चित..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram