ABP Majha Headlines : 5 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांना फेरपरिक्षेत नापास झाल्यानंतर त्याच इयत्तेत बसावं लागणार, पाचवी आणि आठवीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

भुजबळांना केंद्रात मोठी संधी देण्याची अजित पवारांची इच्छा, देवेंद्र फडणवीसांची माहिती.. भुजबळ भाजपात येणार नसल्याचंही केलं स्पष्टीकरण...

छगन भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका वाक्यात खुलासा, भुजबळ-फडणवीस भेटीनंतर स्पष्टीकरण...

दलित असल्यामुळंच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप, सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांचं सांत्वन, मुख्यमंत्री विधीमंडळात खोटं बोलल्याची टीका...

परभणी आणि बीड दोन्ही घटनांमध्ये मुख्यमंत्री खोटं बोलले, त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, पटोलेंची माहिती...तर राहुल गांधींची परभणी भेट राजकीय, फडणवीसांचा हल्लाबोल...

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाटांनी घेतली मस्साजोगच्या सरपंचांच्या कुटुंबीयांची भेट...बीडमध्ये पोलिसांचेच गुंडांशी लागेबांधे, शिरसाटांची धक्कादायक माहिती...

पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचक अटी हटवणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहानांची घोषणा...मोबाईल आणि दुचाकी असणाऱ्यांनाही फायदा...महाराष्ट्रात  १९ लाख ६६ हजार घरं देणार...

शरद पवारांचे आमदार बापू पठारेंनी घेतली अजित पवारांची भेट, मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारेंची माहिती, राजकीय चर्चा झाली नसल्याचाही दावा

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram