ABP Majha Headlines : 6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. तारा भवाळकरांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी घोषणा केली आहे, या सहाव्या महिला अध्यक्ष आहे. ९८ वर्षात ६ महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या.

 कोण आहेत डॉ. तारा भवाळकर 

डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचं लेखन आणि गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केलं आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram