ABP Majha Headlines : 4 PM : 8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 4 PM : 8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत, ६५ वर्षांचा झालोय असं वक्तव्य, दुसरा आमदार मिळाला म्हणजे माझ्या कामाचं महत्व कळेल असंही विधान...
माझ्या सरकारनं ६०० निर्णय घेतले, पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत...
शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल...तर फडणवीस सर्वांचे बाप, नितेश राणेंचं प्रत्युत्तर...
विदर्भात भाजपाला आणखी एक धक्का, माजी आमदार गोपाळ अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार...३ वेळा काँग्रेसमधूनच झाले होते आमदार..
केंद्र सरकारचा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचा निर्णय, ९० दिवस खरेदी करणार, सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपयांचा हमी भाव...विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय...
लालबागच्या राजाची पहिल्या दिवसाची दानपेठी खुलली, राजाच्या भक्ताकडून नोटांच्या माळा अर्पण, महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मोजणी सुरू...
दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... जयघोषात गणपतीचं विसर्जन, प्रशानसाकडूनही विशेष तयारी