ABP Majha Headlines : 4 PM : 22 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 22 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
१० दिवसांपासून सुरु असलेलं लक्ष्मण हाके आणि वाघमारेंचं उपोषण स्थगित, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार
छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली लक्ष्मण हाकेंची भेट.. सगेसोयरे हा शब्द नाही, यावर सरकार ठाम असल्याची पडळकरांची माहिती.
मराठा आणि ओबीसी आंदोलन प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार, अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक, गिरीश महाजनांची घोषणा
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य, महायुतीत अजितदादांचं मानसिक खच्चीकरण सुरु असल्याचाही आरोप
शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, दुष्काळापाठोपाठ शेतकऱ्यांवर पाणीपट्टीवाढीचं संकट, ऊस, केळीसह बारमाही पिकांना फटका बसण्याची शक्यता तर विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा