ABP Majha Headlines : 4 PM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर, सरकारचं शिष्टमंडळ उद्याच हाकेंकडे पाठवतो, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या... शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना...तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री, विधानसभेच्या अनुषंगाने वरळीत घेणार बैठका, संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार
अजित पवारांच्या समावेशाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर, अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली... मिटकरींनी कदमांना सुनावले बोल
लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची ४० केंद्रावरील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी, १८ लाखांचं शुल्कही भरलं... विखेंनी पराभव मान्य करावा, लंकेंचा टोला
तलाठ्यापासून नीटपर्यंत सर्वच परीक्षांत घोळ, एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, राज्यातील गृह मंत्रालयाच्याच तक्रारी का वाढतायत?, फडणवीसांना सवाल