ABP Majha Headlines : 4 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  4 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
पवारांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जयंत पाटलांच्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा, एका पक्षातून किती चेहरे देणारे? सुप्रिया सुळे, आव्हाडांचा उल्लेख करत राऊतांचा प्रश्न
मविआत लहान-मोठा भाऊ असं नाही, संजय राऊताची स्पष्टोक्ती, तर भ्रष्ट सरकारला पराभूत करण्यासाठी प्रसंगी दोन पावलं मागे येऊ, राऊतांचं वक्तव्य
समाजवादी पक्षाचे अबू आझमी १२ जागांसाठी आग्रही, सोशल मीडियावरील पोस्ट मविआसाठी इशारा असल्याचा दावा
आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार सूत्रांची माहिती
सुमार कामगिरीमुळे राम कदमांसह मुंबईतल्या भाजपच्या ५ आमदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता... गोपाळ शेट्टींसह जुन्या नेत्यांचे होणार पुनर्वसन.. 
यंदा भाजपचा जाहीरनामा किंवा वचननामा नाही तर अंमलबजावणीचा आराखडा, मतदारांकडून सूचना मागवून करणार प्रकाशन, काँग्रेसच्या अपूर्ण आश्वासनांचाही घेणार समाचार
मावळचे राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंना पक्षातूनच विरोध... प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडेंनी महामंडळ नाकारत, मागितली उमेदवारी... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram