ABP Majha Headlines : 9 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाल्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची हवा पसरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळवला. तर 128 जागा लढवणाऱ्या मनसेला एकाही जागेवर उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित होता. याबाबत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली.
मनसेला सोबत घेण्यासंदर्भात शून्य टक्के चर्चा आमच्या पक्षात आहे. मनसे किंवा आम्ही त्यांना साद घालू ,असं मला वाटत नाही होईल. मनसे नेमकी कोणासोबत होती हेच त्यांनी आधी क्लिअर करावं ? ते म्हणत होते, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा एकूण सूर पाहता सध्यातरी मनसे आणि ठाकरे गटात एकत्र येण्याविषयी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे संकेत मिळत आहेत.