ABP Majha Headlines : 10:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 10:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भारतानं तब्बल १७ वर्षांनी पुन्हा जिंकला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक, थरारक फायनलमध्ये रोहितसेनेची दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात, बुमरा, अर्शदीप, हार्दिकचा प्रभावी मारा, कोहली सामनावीर
. विराट कोहली आणि रोहित शर्माचा ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम;
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावर आजी-माजी कर्णधाराची मोठी घोषणा
विजयानंतर देशभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव , पंतप्रधान मोदींनी फोनवरुन दिल्या शुभेच्छा, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिन तेंडुलकरकडूनही कौतुक
टीम इंडियाच्या विजयानंतर देशभर जल्लोषाला उधाण, रात्रीपासूनचा विजयाचा फिव्हर अजूनही कायम
मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पहिल्यांदाच 'मन की बात', 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 111 वा भाग
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र, अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गँगस्टर अबू सालेमलाला १२ वर्षांची शिक्षा माफ ... आतापर्यंत कारागृहात घालवलेला कालावधी शिक्षेतून वजा होणार