ABP Majha Headlines : 6 PM : 3 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 3 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
हेही वाचा
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत (Uday Samant) रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील पण शिवसेना त्यांचा पराभव करेल ,असं मोठं विधान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केले आहे. उदय सामंत हे कुणाचेही होऊ शकत नाहीत त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप राजन साळवींनी केला आहे. स्थानिकांचा विरोध असताना देखील उदय सामंत यांना 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश दिला गेला. सामंत यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली होती, असं देखील राजन साळवी यांनी म्हटलं आहे.
किरण सामंत यांच्या रूपाने भविष्यात प्रत्येकाला आपला वाटणारा आणि घरातला आमदार मिळेल अशी टीका उदय सामंत यांनी राजन साळवी यांचं नाव न घेता केली होती. राजन साळीव यांनी त्याला आता उत्तर दिले आहे. मी एकाच पक्षात मागची 40 वर्ष काम करत आहे. नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि आमदार अशी विविध पद मी भूषवली आहेत. सर्वांच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी झालो आहे. अगदी बारसं आणि पाचवीला देखील मी गेलो आहे. काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतील हातखंबा येथे एक अपघात झाला होता. त्या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. त्यावेळी एक लहान बाळ दुधासाठी रडत होतं. अशावेळी माझ्या वहिनीने त्या बाळाला आपल्या अंगावरच दूध दिलं होतं, आम्ही अशी माणसं आहोत, असं प्रत्युत्तर देखील राजन साळवी यांनी सामंत बंधू यांना दिले आहे.