ABP Majha Headlines 3 PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 26 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 3 PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 26 July 2024 Marathi News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका

विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला, पराग शाहांऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता...

सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..

देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही राहतायत हजर..आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित..

काही पक्ष महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी असा सवाल..

पुण्यात आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग घटला, पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड

पुण्यातली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळंच, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप, पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातून पाणी का सोडलं असा सवाल..

सांगली शहरातले ८० कैदी कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये हलवले, सांगलीतली पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय, आणखी काही कैदी आज हलवलणार...

नंदुरबार जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामळं सुरत-भुसावळ रेल्वे सेवा ठप्प,रेल्वे स्टेशनांवरच अडकल्या अनेक गाड्या...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram