ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 25 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 25 July 2024 Marathi News
पुण्याला पावसाने झोडपलं...शाळा, कार्यालयांना सुट्टी... खडकवासल्यातून दुपारी चार वाजता विसर्ग आणखी वाढवणार...
सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरा, गरज पडल्यास अडकलेल्यांना एअरलिफ्ट करा, पुण्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
अजित पवारांनी घेतला पुण्याच्या पूरस्थितीचा आढावा...घाबरण्याचं कारण नसल्याचं लोकांना केलं आवाहन...
पुण्यात सिंहगड रोडवरील एकतानगरमध्ये कंबरेपर्यंत पाणी, जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा, पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्याने संताप
मुसळधार पाऊस आणि धरणातून विसर्ग, यामुळे पुण्याची जलकोंडी, रस्ते बनले नद्या, बोटीतून मदतकार्य
मुंबईतली मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे....कुर्ल्याच्या क्रांतीनगर वसाहतीला सतर्कतेचा इशारा
मुंबई शहर उपनगरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस.. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार...
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी चार तलाव तुडुंब... मुंबई, ठाणे, भिवंडीतली १० टक्के पाणीकपात मागे...