ABP Majha Headlines : 3 PM : 18 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 18 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नाशिकमध्ये दोन गटातील वादाप्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल तर २० हून अधिक जण अटकेत, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगल भडकावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद
उद्धव ठाकरे मुंबईत राबवणार शिव सर्वेक्षण अभियान, १८ नेते आणि १८ सहायकांवर सोपवली ३६ मतदारसंघांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी..
साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी बांधल्या राख्या, खासदार उदयनराजेंच्या गैरहजेरीची चर्चा
पात्र महिलांना लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढा, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी, काळे झेंडे दाखवल्यानंतर सुनील तटकरेंची कठोर भूमिका तर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी मिटकरींची मागणी
जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे, पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक...
अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा कर्जत-जामखेड दौरा, आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात अचानक दौरा केल्याने चर्चांना उधाण
महाविकास आघाडीला १७५ ते १८० जागा मिळतील, संजय राऊतांनी वर्तवला अंदाज, राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून गेलेले अनेक जण परतण्यासाठी इच्छुक असा दावा.
सोशल मीडियासाठी शिवसेनेचा नवा चेहरा,
राहुल कनाल यांच्या खांद्यावर जबाबदारी, सोशल मीडिया राज्यप्रमुख पदी वर्णी