ABP Majha Headlines : 03 PM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये ६५ मंत्री शपथ घेणार, शपथविधीआधी भावी मंत्र्यांसमोर मोदींनी माडंला १०० दिवसांचा रोडमॅप

अमित शाह, राजनाथ सिंग, पियूष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रिपदाची शपथ, एस जयशंकर यांनाही मंत्रिपदाचा कॉल, तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली

पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी, रक्षा खडसेंनाही शपथविधीचा फोन, रामदास आठवले पुन्हा टीम मोदीमध्ये तर विदर्भातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी

राष्ट्रवादीला कॅबिनेट देणं शक्य नसल्यानं मंत्रिमंडळातला सहभाग खोळंबला, सूत्रांची माहिती...राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फडणवीसांची चर्चा...

रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण, मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान

नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच, मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची थोड्याच वेळात मुंबईत बैठक, नवनिर्वाचित खासदारांना शरद पवार मार्गदर्शन करणार. 

ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, धनंजय मुंडेंचं नाव न घेता जरांगेंचा इशारा

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजाकडून परळीत बंदची हाक, उद्या वडवणीमध्येही बंदचं आवाहन

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, सिंधुदुर्गात गेल्या २४ तासात १२१ मिलीमीटर पावसाची नोंद, तर कुडाळमध्येही १५७ मिलीमीटर पावसाची नोंद

मुंबईत मान्सून दाखल तर ११ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार... उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विस्तारणार मान्सून

मुंबई मेट्रो ३ ची आरे ते बीकेसी मार्गीका जुलैपर्यंत सुरू होणार... तर उद्यापासून मेट्रो३ च्या एका लाईनची चाचणी होणार

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, न्यूयॉर्कमधील मैदानावर दोन्ही संघ भिडणार.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram