ABP Majha Headlines : 12:00 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  12:00 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

१२१ जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका, एफआयआरमध्ये भोलेबाबचं नाव वगळलं
भोलेबाबाच्या पायाखालच्या पवित्र माती गोळा करण्याच्या नादात १२१ बळी, बाबाची चरणधूळ चमत्कारी असल्याचा भक्तांची श्रद्धा
अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती... बैठकीला आमंत्रण आल्यामुळे मलिक उपस्थित राहिले, फडणवीस, एकनाथ शिंदेंना रूचणार का याची चर्चा
विधानपरिषदेच्या नऊच्या नऊ जागा निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना, विधानसभेच्या तयारीला लागण्यचेही आदेश
लाडकी बहीण योजनेत दोन बदल... वयाच्या मर्यादेत ६५ वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार,  तर अर्ज भरण्यासाठी ⁠३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
एससी एसटी मतांसाठी भाजप पुन्हा आक्रमक, एससी एसटी मोर्चासह फडणवीसांनी घेतला आढावा, विधानसभा निवडणुकीत बेसावध न राहण्याच्या सूचना
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी लढण्याची शक्यता, पटोलेंची माझगांव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड
दीक्षाभूमीवर झालेल्या हिंसक आंदोलनाबाबत गुन्हा दाखल, वंचितचा शहर अध्यक्ष रवी शेंडेही आरोपी, इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram