ABP Majha Headlines 8 PM एबीपी माझा हेडलाईन्स 28 July 2024 Marathi News
मुंबईची पाणीकपात आजपासून मागे, धरणांमध्ये मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध...
मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या किंमती १००पार.. टोमॅटो १२० तर कडधान्यांचीही शंभरी पार..
महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती, पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असं मत व्यक्त...
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नीट याचिकांवरील सुनावणीमुळे मागच्या वेळी लांबली होती सुनावणी
पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा, हजर होण्याच्या मुदतीला सहा दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार
तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा...दरेकर,नितेश राणे,किरीट सोमय्यांचा लव-जिहादमधून हत्या झाल्याचा आरोप..
भारताला आजही पदकाची आशा, मनू भाकरनंतर रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल, तर अर्जुन बबूताही पुरुष नेमबाजांच्या दहा मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय, ७ विकेट्सनी पराभव करत टीम इंडिया २-० ने आघाडीवर...
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि द फडणीस यांचं आज शंभरीत पदार्पण, पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'शि द १००' महोत्सवाचं आयोजन