ABP Majha Headlines : 7 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  7 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आणि आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात दोन ठिकाणी मोठं घबाड सापडलं होतं. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरिल खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या. त्यानंतर हडपसरमध्येही पोलिसांनी नाकाबंदीच्या वेळेस (दि.22) संध्याकाळी एका गाडीतून तब्बल 22 लाख 90 हजार रुपये रोकड जप्त केली होती. आता मुंबईतील भुलेश्वरमध्येही असचं मोठं घबाड सापडलं आहे.   भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त मुंबईच्या भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या  प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. यापूर्वी पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात येत होता. आता मात्र, पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते.   आयकर विभागाला पाचारण करण्यात आलंय पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भुलेश्वरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून लोक कुठे जात होते. ही रक्कम कोणाची आहे. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना पोलीस ठाण्यात आणण्या आलं आहे. याबरोबरच या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सातत्याने अशी रोकड सापडत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.   मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर प्लाझाजवळ पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त करण्यात केली होती. चालकासह कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, कारमधील शहाजी नलावडे हे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सहकारी असल्याची चर्चा होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram