ABP Majha Headlines : 9 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सुजय विखेंच्या (Sujay Vikhe) सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा खळबळ उडाली आहे. जयश्री थोरातांवर खालच्या पातळीवर टीकेनंतर गाड्याची जाळपोळ करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनवर काँग्रेस कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत. दरम्यान वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखेंनीही निषेध केलाय. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलीय. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील वक्तव्याचा निषेध केला आहे. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची, अशी टीका सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केली आहे.
सत्यजीत तांबे म्हणाले, सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे. या वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.