ABP Majha Headlines : 11 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  11 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. गाठीभेटी पक्षांतर, उमेदवार याद्या, उमेदवारी अर्ज भरण्यात येत असून राजकीय क्षेत्रात हालचाली वाढल्या आहेत. अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.  दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.  अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरी ही भेट झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्व पक्षांच्या याद्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आपले निर्णय, उमेदवार जाहीर करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. या दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे. मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सांमत यांच्यात मैत्रीपुर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे.  भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. मी त्यांना विचारलं त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावं बोलावं या उद्देशाने आलो होतो. रात्री भेटलं तरी बातमी होते, उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते.त्यामुळं करायचं काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे.आजची चर्चा राजकीय चर्चा नव्हती, मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली चहा घेतला आणि निघालो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram