ABP Majha Headlines : 7 AM : 27 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :   7 AM :  27 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके, आज मराठी भाषा गौरव दिन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार 

हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, प्रलंबित मागण्यांसाठी रात्रभर मुक्काम, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार

मुंबईत आज पाणीबाणी, शहापूरमधील पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग, मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील काही भागात १०० टक्के तर काही ठिकाणी ३० टक्के पाणीपुरवठा

बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट, तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मनमाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरु राहणार, उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये

काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष बसवराज पाटील भाजपच्या वाटेवर, आज संध्याकाळी भाजप प्रवेशाची शक्यता

लोकसभा निवडणुकीत १२ जागा घेणं शिवसेना आमदारांना मान्य नाही, शिवसेनेनं १८ जागांवर लढलं पाहिजे, आमदारांचा एकनाथ शिंदेंकडे आग्रह

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola