ABP Majha Headlines : 12 PM : 25 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 25 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. हे आज दिसून आलंय, असं खळबळजनक विधान कर्जत-जामखेडमधील भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलं आहे. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता, असा आरोप राम शिंदे यांनी केला. अजित पवार आणि रोहित पवार () यांची आज भेट झाली. या भेटीनंतर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम शिंदे काय म्हणाले? राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. यासंदर्भात मी आगोदरच सांगितलंय. माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती मात्र अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय. मला वाटतं की कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला. शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. मतमोजणीसंदर्भात तक्रार केली आहे, मात्र ती फेटाळण्यात आलीय. जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करणार आहे, हे काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार आहे, असंही राम शिंदे यांनी सांगितले.