ABP Majha Headlines : 6:30 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. शिंदेंच्या पहिल्या यादीत मंत्री उदय सामंतांसह त्यांच्या भावाचाही समावेश शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारीजाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीमधून मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर दापोलीमधून योगेश कदमांना तिकीट देम्यात आले आहे. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेले नाही.