ABP Majha Headlines : 1 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून सर्व 40 विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. सांगोल्यातून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.
सांगोल्याचे विद्यामान आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत...मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार...उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाहीय. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.