ABP Majha Headlines 2PM एबीपी माझा हेडलाईन्स 2 PM 23 July 2024 Marathi News

Continues below advertisement

नव्या कररचनेत मोठे बदल...३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही...नव्या कररचनेतील बदलांमुळे करदात्यांना साडे सतरा हजारांचा फायदा... 

पगारदार आयकरदात्यांसाठी प्रमाणित वजावट ५० हजारांवरुन ७५ हजारांवर, तर फॅमिली पेंशनधारकांसाठी प्रमाणित वजावट १५ वरुन २५ हजारांवर 

सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांची एंजल टॅक्समधून मुक्तता, विदेशी कंपन्यांना कॉर्पोरेट करात सवलत, सुधारित कॉर्पोरेट सवलत ३५ टक्के

मोबाईल फोन, चार्जर, चांदी, सोनं, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त...तर प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार... 

महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना...५०० टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिन्यांची इंटर्नशीप...महिन्याला ५ हजार रुपये भत्ता... 

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद...३२ फळ आणि भाज्यांच्या १०९ जाती वितरीत करणार...नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार 

ग्रामविकासाठी २ लाख ६६ हजार कोटी रुपयांची तरतूद...राज्यांना १५ वर्षे व्याजमुक्त कर्जपुरवठा केंद्र सरकार करणार... 

EPFO सदस्यांसाठी मोठी घोषणा... पहिल्यांदा पीएफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला एक महिन्याचा पगार तीन हप्त्यांत देणार... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram