ABP News

ABP Majha Headlines : 2 PM : 23 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  2 PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

 मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे.   आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करनार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार असल्याचंही त्यानी जाहीर केलं आहे. मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी (Farmer) आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं. लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते, आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असेही जरांगे यांनी म्हटले.   5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठका निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचं तसंच सुरु झालं आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकतीने लावून धरणार आहोत. त्यासाठी, 5 सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघानिहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे यांनी केली आहे.   पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली भेट मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सध्या नेतेमंडळी आणि आमदार, खासदारांच्या रांगा लागल्या आहेत. नुकतेच, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मनोज जरांगे यांनी अंतरवालीत जाऊन भेट घेतली. मी केवळ त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अस जरांगे यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram