ABP Majha Headlines : 12 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  12 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आज शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. 

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यातच आता मराठा नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या बॉण्डवर जो लिहून देईल, त्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram